सोशल डिस्टंसिंग आणि क्वारंटाईन चे महत्व


   

      आज जवळ जवळ महिन्यांपासून कोरोना विषाणू जगात आपलं ठाण मांडून आहे . वैश्विक महामारी किंवा जागतिक साथीचा रोग म्हणून या आजाराकडे पहिले जात आहे. प्रत्येक जण कोरोना विषाणूने (कोविड -१९) असुरक्षित आणि चिंतेत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आणि त्याची शक्ती लक्षात घेता भारतामध्ये २१ दिवसांसाठीचा lockdown हा जो १४ एप्रिल पर्यंत अपेक्षित होता पुढे वाढवून मे पर्यंत करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर ३० एप्रिल पर्यंत हा कालावधी वाढवण्यात आला होता. अर्थात महाराष्ट्रात देखील आता मे पर्यंत असणार आहे.
              महामारी घोषित होण्याआधी कुठलाही आजार पसरण्यामध्ये तीन टप्पे असतात. . परदेशातून येणाऱ्या संक्रमित लोकांमार्फत आजार पसरणे. . स्थानिक लोकांमार्फत पसरणे आणि . सामुदायिकरीत्या गतिविधींमार्फत पसरणे. तिसऱ्या टप्प्यातील संक्रमणापासून या विषाणूला रोखण्याकरिता lockdown वाढवण्याचा निर्णय जगातील अनेक देशांनी घेतला आहे.
              भारतामध्ये हळू हळू तिसऱ्या टप्प्याचा प्रभाव दिसणे सुरु झाले आहे.  तज्ञांच्या मते, सोशल डिस्टंसिंग (स्वसुरक्षेसाठी सामाजिक अंतर राखणे) अशा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखने सोपे जाते. परंतु भारतासारख्या विशाल आणि अति-लोकसंख्येच्या देशामध्ये सोशल डिस्टंसिंग सारखे प्रयोग राबवणे आणि त्याला यशस्वी करणे आव्हानात्मक आहे. अनेक महानगरामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. याचकारणाने आवश्यक वस्तूंच्या खरेदी साठी देखील लोकांची अमाप गर्दी पाहावयास मिळते आणि प्रशाशनाने दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करताना अडचणी येतात. कोरोनाच्या ८०% रुग्णांना सौम्य आजार होतो. बाकी २०% पैकी फक्त १०% रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करावे लागते त्यामुळे या आजारास घाबरून जात काही पथ्य आणि नियमांचे पालन करणे फायद्याचे ठरते. होम क्वारंटाईन ही संकल्पना देखील आपल्या सोयीसाठी आहे. ज्यांना कुणाला सर्दी, ताप, खोकला,यासारखे लक्षणे आहेत (जे हवामान आणि ऋतू बदलामुळेही असू शकतात) अशांनी लगेचच स्वतःला लोकांपासून विलग करणे आवश्यक आहे. तसेच ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. जेणे करून आपल्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना त्याचा संसर्ग होणार नाही.
           BBC समाचार चैनलच्या बातमीनुसार सध्यातरी कोरोनावरील उपचाराकरिता कुठलीही विशिष्ठ अशी लास किंवा औषध उपलब्ध नाही. म्हणूनच सोशल डिस्टंसिंग आणि क्वारंटाईन महत्वाचे बनते. असे केल्यानेच स्वाईन फ्लू आणि इतर साथीच्या रोगांप्रमाणे ही साथ ही आपोआपच ओसरू लागेल. सोशल डिस्टंसिंग आणि क्वारंटाईनचे पालन केल्यास आपल्या देशचा आणि संपूर्ण जगाचा एका साथीच्या रोगाने कसा घात केला हा इतिहास भावी पिढीसाठी उरेल.

*हे करू नये*
 • ग्रुपमध्ये जमा होणे.
 • मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी जाणे.
 • गल्ली किंवा मैदानात खेळणे.
 • घरामध्ये मोलकरीण किंवा घरगडी कडून कामे करवणे.
 • गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जाणे.
*हे करताना सावध राहा*
 • रेशन घेताना
 • बाहेर जाताना
 • प्रवास करताना
 • औषधे खरेदीसाठी जाताना
 • कुणाशी समोरासमोर बोलताना


*हे करू शकता*
 • आपल्या घरात खेळू शकता.
 • घराची सफाई करू शकता.
 • नवनवीन पदार्थ बनवू शकता
 • आवडते शोज बघू शकता
 • पुस्तके वाचू शकता
 • मित्रांची/नातेवाईकांची फोन करून विचारपूस करू शकताOldest