कोरोना बरोबर तुमच्या डोळ्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक

डिजिटल उपकरणे आणि तुमची डोळे
कोरोना बरोबर तुमच्या डोळ्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक


स्मार्टफोनच्या पूर्वी आपला समाज कश्या प्रकारे कार्य करत असेल?

         या छोट्याशा  इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची आपल्यावर अशी पकड आहे की हे प्रत्येक क्षणी आपले लक्ष स्वतःकडे वेधून घेतो. डीलॉइटच्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकन एकत्रितपणे दररोज 8 अब्ज वेळा त्यांचे फोन तपासतात. भारताची लोकसंख्या पाहता हे प्रमाण भारतात किती तरी पटीने जास्त असेल यात काही शंका वाटत नाही. या आकडेवारीला पचवणे फार कठीण आहे. परंतू त्रासदायक गोष्ट म्हणजे यामुळे उद्भवणाऱ्या आजाराबद्दल किंवा नंतरच्या काळातही लोकांना हा आजार आपण Digital Gadget वर जास्त वेळ घालवल्यामुळे झाला हे लक्षात येत नाही. 

         सध्या देशात आणि ऐकूनच जगात कोरोना विषाणू ने धुमाकूळ घातला आहे. जणू या विषाणू बरोबर जागतिक युद्ध सुरु आहे. अश्या या युद्धात जगाला अजूनही यश आलेलं दिसत नाही. अगदी युरोपीय देश आणि अमेरिके सारख्या बलाढ्य, शक्तिशाली आणि जागतिक महासत्ता असणाऱ्या देशांना ही या विषाणू ने आपल्या विळख्यात ओढवून घेतले आहे. संपूर्ण जग या विषाणू ला हरवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.
याच पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात विविध ठिकाणी लोकांच्या बाहेर फिरण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहे. सर्वदूर दुकाने, कारखाने, लघु, माध्यम आणि सर्वच प्रकारचे उद्योगधंदे बंद करण्यात आलेले आहे. शहरातील IT आणि Technology मध्ये काम करणार्यांनाही घरातून काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे देशातील बहुतांश मंडळी कार्यालयीन कामे घरातूनच करीत आहेत.

          कोरोनाच्या पार्श्वभूमी वर देशातील Lockdown च्या परिस्थितीमध्ये मोबाईल, टॅब, टिव्ही तसेच संगणकांचा वापर वाढू लागला आहे. याच कारणाने जग हे डोळ्याच्या विकाराकडे धाव तर घेत नाही न असा संशय येतो. हल्ली लहान लहान मुलं स्मार्टफोन वर खेळतात. त्यांना किती येतं म्हणून आपण कौतुक ही फार करतो. परंतु मुलांसाठी त्याचा अधिक वापर योग्य नाही. सरासरी, आपण दररोज इंटरनेट ब्राउझ आणि अँप्स वापरुन सुमारे पाच तास घालवितो. जर आपण संगणकासमोर केलेला संपूर्ण दिवस काम हा स्क्रीन वेळही जोडला, तर आपण तंत्रज्ञानाच्या किती आहारी गेलो आहोत असा निष्कर्ष काढता येईल. याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर आणि एकूणच संपूर्ण आरोग्यावर होतो.


          तज्ञांच्या मते,जास्तीच्या स्क्रीन टाईम मुळे खालिल समस्या निर्माण होतात- 

  1. कोरडे आणि चिडचिडे डोळेDigital gadgets च्या अती वापरामुळे डोळे कोरडे आणि चिडचिडे होतात. Scientific Studies दर्शवतात की टॅबटिव्ही किंवा संगणकावर बघताना सर्वच वयोगातील लोकं बऱ्याच वेळा डोळे मिचकावतात. ज्यामुळे डोळे कोरडे होतात. स्पष्ट दृष्टीसाठी डोळ्याच्या पृष्ठभागावर एक स्पष्ट आणि स्थिर अश्रु फिल्म आवश्यक आहे. मुलांसाठी ही समस्या अधिक गंभीर असू शकते.

   2. झोप कमी लागणे (झोपेवर परिणाम)


जास्तीच्या स्क्रीन टाईम मुळे होणारी दुसरी महत्वाची समस्या म्हणजे होपेवर होणार परिणाम. 
संशोधनातून असे दिसून आले आहे की संध्याकाळी वापरली गेलेली संगणक आणि डिव्हाइस screen वरील निळा प्रकाश मेंदूच्या झोपेच्या लयमध्ये बदल करतो.

3. दूरदृष्टी 

4. चष्मा लागणे यांसारख्या अनेक समस्या निर्माण होत आहेत.

डोळे हा फार नाजूक आणि संवेदनशील अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घेणे महत्वाचे ठरते. सध्याच्या या नाजूक काळात डोळ्यांची तसेच संपूर्ण शरीराची अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत नेत्रतद्यांनी दिली आहे. 


 **अशी घ्यावी डोळ्यांची काळजी**

  •   दररोज स्क्रीन वेळेवर मर्यादा सेट करा. आपल्या मुलांनाही हे स्पष्ट करा आणि त्याचे पालन करा.
  •   हिरव्या पालेभाज्या व ताजी फळे यांचे जास्त सेवन करावे.
  •   पाणी भरपूर प्यावे.
  •   संगणकावर काम करताना प्रत्येक तासाने ५-१० मिनिटांचा ब्रेक घ्यावा.
  •   सतत मोबाईल, टीव्ही पाहण्याऐवजी पुस्तके, वर्तमान पत्रे वाचण्यात वेळ घालवावा.

Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
Unknown
admin
May 18, 2020 at 8:44 AM ×

Helpful information sir

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar